Wednesday, July 11, 2012

चालू घडामोडी


-पाकिस्तानातून 1955 मध्ये अटारी सीमा ओलांडून भारतात चुकून आलेल्या सिराज मुराद खान याने चांगली नोकरी मिळत नसल्याने मायदेशी परत पाठवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
-राज्य सरकारने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेनेही शिवआरोग्य सुरक्षा कवच योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना फक्त करदात्यांसाठी असून, येत्या महिन्यातच त्याचा प्रारंभ होणार आहे.
-मंत्रालय आगीबाबतच्या लोकांच्या मनातील शंका दूर करायच्या, तर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.
-ऑलिंपियाडमध्ये कॅरमचा समावेश व्हावा आणि त्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, असे स्वप्न मुंबईच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संगीता चांदोरकर यांनी बाळगले आहे.
-आपल्या देशात सध्या भंपकपणाचीफॅशनप्रचलित करण्याचा चंगच रा. स्व. संघाच्या लोकांनी बांधलेला दिसतोय. नुकत्याच पुणे भेटीवर आलेल्या नरेंद्र मोदी यांनारामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीम्हणजेच संघीय थिंकटॅँकतर्फे गौरविण्यात आले. शेकडो लोकांच्या नरसंहाराचा ज्यांच्यावर ठपका आहे, त्या मोदींना चक्कहे विश्वची माझे घरअशी वैश्विक बंधुभावना जोपासणा-या ज्ञानोबा माऊलींचीज्ञानेश्वरीदेण्यात आली. आणि मूर्खपणाचा कळस म्हणजे, अखंड नामस्मरणात, रामकृष्णहरी या नादात जी वीणा माधुर्य भरते, ती वारकरी संतांची पवित्र वीणासुद्धा मोदींच्या रक्ताळलेल्या हातात देण्यात आली. ‘सैतानाच्या मुखी रामनामहा वाक्यप्रचार आम्ही आजवर ऐकला होता. पण संघाच्या या नव्या नाटकामुळे तो पाहायला मिळाला..

No comments:

Post a Comment