Wednesday, July 30, 2014

दिन विशेष ,जुलै ३१


जुलै ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१२ वा किंवा लीप वर्षात २१३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी 
आठवे शतक 
७८१ - जपानच्या फुजियामा ज्वालामुखीच्या उद्रेकाची प्रथम नोंद.
अकरावे शतक 
१००९ - सर्जियस चौथा पोपपदी.

पंधरावे शतक
१४९८ - क्रिस्टोफर कोलंबस त्रिनिदादला पोचला.

अठरावे शतक
१७०३ - डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुले मारली.

एकोणिसावे शतक
१८५६ - न्यू झीलँडची राजधानी क्राइस्टचर्चची स्थापना.

विसावे शतक
१९१७ - पहिले महायुद्ध - य्प्रेसची तिसरी लढाई.
१९२१ : मोहनदास करमचंद गांधी यांच्या उपस्थितीत मुंबईत परदेशी कापडांची होळी करण्यात आली.
१९३२ - जर्मनीतील निवडणुकांत नाझी पार्टीला ३८% मते मिळाली.
१९४० - अमेरिकेत कुयाहोगा फॉल्स, ओहायो येथे रेल्वे अपघात. ४३ ठार.
१९४५ - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पिएर लव्हालने दोस्त राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले.
१९४७ - मुमताझ , भारतीय अभिनेत्री
१९४८ - न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला.
१९५१ - जपान एरलाइन्सची स्थापना.
१९५४ - इटलीच्या अर्दितो देसियोच्या नेतृत्त्वाखाली गिर्‍यारोहक पथकाचे के-२ शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
१९५६ - ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
१९७१ - अपोलो १५च्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
१९७३ - डेल्टा एरलाइन्सचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
१९७५ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियन चा नेता जिमी हॉफा गायब.
१९८१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू.
१९८७ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान.
१९८८ - मलेशियाच्या बटरवर्थ शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.
१९९२ - थाई एरवेझचे एरबस ए.३०० प्रकारचे विमान नेपाळची राजधानी काठमांडूजवळ कोसळले. ११३ ठार.

एकविसावे शतक
जन्म
११४३ - निजो, जपानी सम्राट.
१५२७ - मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
१९०२ - सर ऑस्वाल्ड ब्राउनिंग ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९१२ - बिल ब्राउन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
१९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
१९७५ - अँड्रु हॉल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९८२ - ब्लेसिंग माहविरे, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू
११०८ - फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
१५०८ - नाओद, इथियोपियाचा सम्राट.
१५४७ - फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
१७५० - होआव पाचवा, पोर्तुगालचा राजा.
१८७५ - अँड्रु जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
१९४० : जलियांवाला बाग हत्याकांड घडवून आणणारा क्रुर इंग्रज अधिकारी ओडावायर याची हत्या केल्याबद्दल क्रांतीकारक उधमसिंग यांना फाशी.
१९४३ - हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (युद्धबंदी असताना).
१९७२ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान.
१९८० - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
१९९३ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा.

प्रतिवार्षिक पालन
हरी पहलावान - मलेशिया.
का हेइ हवाई - हवाई.

Thursday, September 26, 2013

प्रश्नमंजुषा

                                                        प्रश्नमंजुषा
1)महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _________ विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ____________विभागात आहेत.

A. कोकण ,औरंगाबाद
B. औरंगाबाद ,पुणे
C. नागपूर ,औरंगाबाद
D. औरंगाबाद , औरंगाबाद


2)खालीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे/आहेत?
i) 'स्टेट ऑफ द वर्ल्ड सिटीज' ह्या अहवालानुसार जगातील अतिशय प्रगतीशील अशा 95 शहरांच्या यादीत मुंबई व दिल्लीचा समावेश आहे.
ii) ह्या यादीत व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) हे शीर्षस्थानी आहे.
A. फक्त (i)
B. फक्त (ii)
C. दोन्ही विधान सत्य
D. दोन्ही विधाने अस


3)आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन' कधी साजरा केला जातो?

A. 15 सप्टेंबर
B. 15 ऑक्टोबर
C. 15 नोव्हेंबर
D. 15 डिसेंबर
 


4)भारतातले पहिले निर्मलराज्य कोणते?

A. महाराष्ट्र
B. तामीळनाडू
C. सिक्कीम
D. आसाम


5)2012 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणत्या संशोधनासाठी दिले गेले ?

A. जी प्रोटीन
B. टी प्रोटीन
C. ए प्रोटीन
D. पी प्रोटीन


6)2012 मध्ये विशेष चर्चेत राहिलेले 'अँल्युरॉन' काय आहे/होते?

A. इंटरनेट ब्राउझर
B. कॉम्प्युटर/इंटरनेट व्हायरस
C. टॅबलेट संगणक
D. नवीन संगणक प्रणाली (Operating System)


7)संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्वच्छ जल स्त्रोत्र विषयक 'विश्व जल विकास रिपोर्ट ' मध्ये एकूण 124 देशांच्या यादीतील भारताचे स्थान कितवे आहे ?

A. 05
B. 88
C. 100
D. 120


8)2012 चा 'सुलभ स्वच्छता' पुरस्कार कोणाला दिला गेला ?

A. अरविंद केजरीवाल
B. बिंदेश्वर पाठक
C. अनिता नैरे
D. साधना आमटे


9)सचिन तेंडुलकर याला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' या पुरस्काराने सन्मानित करणाऱया ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कोणत्या भारतीय अभिनेत्याचाही अलीकडेच सन्मान केला?

A. नसरुद्दिन शाह
B. अनुपम खेर
C. अमिताभ बच्चन
D. शाहरूख खान


10)महाराष्ट्र राज्य सेंद्रीय शेती धोरण समितीचे अध्यक्ष ___________ हे आहेत.

A. न्या.व्यंकटेश चपळगावकर
B. डॉ. आ.ह.साळुंखे
C. वसंत गोवारीकर
D. डॉ.शंकर राउत


11)ई.एन.राममोहन समिती _______________ ह्या कारणासाठी नेमण्यात आली .

A. विद्यापीठ अनुदान
B. महिला आरक्षण
C. बाबरी मस्जिद चौकशी
D. दांतेवाडा येथील माओवादी हल्ला चौकशी


12)हरियाणा सरकारने लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ____________ हे वेबपोर्टल सुरु करण्यात आले.

A. संतुष्ट
B. समाधान
C. लोकमानस
D. पीपल-फर्स्ट


13)पवन उर्जा निर्मितीत भारतचे जागतिक स्थान ______आहे .

A. 2रे
B. 3रे
C. 4थे
D. 5वे


14)साक्षरता मोजताना भारतात किती वयावरील व्यक्तीचा विचार केला जातो ?

A. 4 वर्षे वरील
B. 5 वर्षे वरील
C. 6 वर्षे वरील
D. 7 वर्षे वरील


15)संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा धाडसी निर्णय इंदिरा गांधींनी ___________ या वर्षी घेतला.

A. इ.स. 1971
B. इ.स. 1969
C. इ.स. 1977
D. इ.स. 1975
 


16)इ.स.1916 मध्ये झालेला 'लखनौ करार ' हा ____________ ह्यांच्यात झाला.

A. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लीम लीग
B. इंडियन नॅशनल काँग्रेस मधील जहाल आणि मवाळ गट
C. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
D. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि खिलापत चळवळीतील नेते


17)भारताने पोखरण-2 अणुचाचण्या ________मध्ये घेतल्या.

A. जानेवारी 1974
B. जानेवारी 1997
C. मे 1974
D. मे 1998


18)सन 2010 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेकडून _________वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते.

A. जागतिक साक्षरता
B. पर्यावरण रक्षण
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता
D. दहशतवाद विरोधी


19)रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते ?

A. किरण बेदी
B. सी.डी.देशमुख
C. दीप जोशी
D. विनोबा भावे


20)शिक्षण क्षेत्रातील नोबेल असा लौकिक असलेला 'वाईज पुरस्कार' कोणत्या भारतीयाला अलीकडेच देण्यात आला ?

A. माधव चव्हाण
B. कपिल सिब्बल
C. प्रोफेसर यशपाल
D. यापैकी ना
 
 
 

Blog information

 Also find useful material for general studies and CSAT on below blog:

tusharupsc.blogspot.in/

Tuesday, September 3, 2013

आपलाच दाम खोटा!

रूपया का घसरला त्याचे चांगले वाईट परिणाम - अभ्यास लेख

उदारीकरण आणि नव्या आर्थिक व्यवस्थेचे सूतोवाच करून २२ वर्षे झाली तरी थेट परकीय गुंतवणूक अवघी पावणेदोन टक्केच असते.. रुपयाच्या घसरणीचा फायदाच निर्यातप्रधान क्षेत्रांना होऊ शकेल, ही शक्यता खरी असली तरी मुळात निर्यात कमीच राहिलेली असते.. उद्योगांना किफायतशीर कर्जे मिळवण्यासाठी देशाबाहेरच पाहावे लागते.. हे असे अर्थकारण असेल तर रुपया गडगडणे क्रमप्राप्त होते, ही वस्तुस्थिती मांडणारा लेख..
रुपयाच्या घसरणाऱ्या दराचा प्रश्न आíथक-साक्षर असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मे २०१३ पासून भेडसावत असताना २८ ऑगस्ट रोजी तो डॉलरच्या तुलनेत ६९ पर्यंत घसरला. मुळात आपल्या देशातील एकूण साक्षरतेचा दर ६६ टक्क्यांच्या आसपास स्थिरावला. देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत सजगता दाखविली जात नाही ही बाब अर्थातच लोकांना त्रासदायक ठरते, तसे परिणामही दिसू लागले आहेत. रुपयाच्या घसरणीचा प्रत्यक्ष दुष्प्रभाव अर्थव्यवस्थेच्या सर्वच स्तरांवर पडताना दिसतो आहे, तो अगदी उद्योजकापासून सर्वसामान्यापर्यंत! रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची वधारणारी किंमत रिझव्र्ह बँक व केंद्र सरकारच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असल्याने घसरण रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात वेळेत घ्यावयाची काळजी घेताना दोघेही दिसत नाहीत. देशाची मध्यवर्ती बँक मलमपट्टी धाटणीची धोरणे राबवून, उपाययोजनांची अंमलबजावणी धिम्या गतीने करताना दिसत आहे. देशाचे माननीय पंतप्रधान व वित्तमंत्री घाबरण्याचे कारण नसल्याची ग्वाही देत आहेत.
भारताच्या चलनाबरोवर ‘ब्रिक’ देशसमूहातील आणि इतरही एकेकाळी नावाजलेल्या देशात त्यांच्या चलनाची घसरण झालेली आढळते. यात प्रामुख्याने रशिया- ५.४८, दक्षिण आफ्रिका- ६.४%, मलेशिया- ८.३८%, दक्षिण कोरिया- ५७%, इन्डोनेशिया- ९.३%, आस्ट्रेलिया- ७.८%, फिलिपाइन्स- ६.२% आणि थायलंड- ६.३८% या सर्व अर्थव्यवस्थांच्या चलनात घट झाली असली तरी भारताच्या रुपयात २०१२ च्या डॉलर-रुपया विनिमय दराच्या तुलनेत २१.६६% ने घट झाली. अर्थात मागच्या तीन महिन्यांत १५.६६% घसरला. चलनविनिमय दराचे अरिष्ट केवळ भारताच्या नशिबी आले आहे असे विरोधी पक्ष आवेशाने दाखवीत असला तरी त्यांनी त्यांची दृष्टी व्यापक ठेवावी. भारताबरोबर इतरही देशांच्या चलनाची पडझड होण्याची कारणे थोडय़ाफार फरकाने भिन्न असली तरी त्यात मुख्य कारण आहे ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुधार दिसत आहे. अमेरिकन सरकारच्या दहा वर्षांवरील ट्रेझरी कर्ज रोख्यावरील व्याजाचे दर १०.४३ टक्क्यांवरून २.८८ टक्क्यांवर जाऊन पोहोचल्यामुळे आशिया खंडातील परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा ओघ अमेरिकेकडे वळविला. अमेरिकन फेडरल रिझव्र्ह बँकेमार्फत रोखे खरेदीकरण कार्यक्रम गुंडाळला जाण्याच्या बातमीने बँका व आयात व्यापाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर मागणी नोंदविण्यात आली. परिणामी, भांडवली बाजार मुंबईचा निर्देशांक ७०० अंशांनी घसरून १८ हजारांवर नोंदला गेला. भारतीय अर्थकारण श्रावणातील काळ्या ढगांप्रमाणे आíथक सावटाखाली झाकोळून गेले.
डॉलर-रुपया विनिमय दर २०१३ मध्येच प्रतिकूल झाला असे नाही, तर १९७५ पासूनच हा दर ८.४१ वरून १९९५ मध्ये ३२.४३ आणि २००१ ला ४७.२३, तर २०१२ पर्यंत ५३.३४ रुपयांवर होता. नवीन अíथक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून रुपयाचे डॉलरच्या तुलनेतील मूल्य निव्वळ ३२.०७ ने घटले, तर शेकडेवारीत ९८.८८ ने घटले. जागतिक स्तरावर इतकी मोठी किंमतहानी भारताव्यतिरिक्त कुठल्या चलनाची झाली नसेल. चलनदरात घट होण्याची कारणे अनेक असली तरी भारताच्या व्यापारतोलातील कायमची कमालीची तूट कमी करण्यात आपण कमी पडतो आहोत. निर्यातवृद्धी धोरणांची वानवा नसून जागतिक व्यापार संघटनेच्या काही सदस्य देश विकसनशील देशांकडून होणाऱ्या निर्यातक्षमतेत आडकाठी निर्माण करीत आहेत. व्यापारतोलाची दुसरी बाजू आयात आपली डोकेदुखी ठरत आहे. आयात पर्यायीकरण धोरण राबवून आयातीला सक्षम पर्याय निर्माण न केल्यामुळे व्यापारतोलातील तूट वाढतच आहे. उदारीकरण धोरणाने आयातवृद्धीला खतपाणी घातले आहे. याचा परिणाम रुपया अजूनच घसरण्यावर होतो आहे. अमेरिकेत २००८ मध्ये आलेले आíथक अरिष्ट व त्याची व्याप्ती युरोपात पोहोचल्यामुळे भारताच्या निर्यात व्यापारात काही प्रमाणात घट झाली असून त्यात अजून अपेक्षित सुधार आलेला नाही. ही बाब रुपयाचे विनिमय मूल्य घसरणीला जबाबदार ठरली आहे.
मागील चार वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था समग्र आíथक निर्देशकाच्या बाबतीत पिछाडीवर गेल्यामुळे सार्वभूम पतमापन घसरण्याचा धोका वाढत आहे. राज्यकोशीय तुटीचे प्रमाण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी ४.९ टक्क्यांवर असून भारताच्या व्यवहारतोलातील चालू खात्यावरील तूट ४.८ टक्के आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा वार्षकि वेग पाच टक्क्यांपर्यंत आला आहे. अर्थात हा वेग अमेरिका व युरोपीय अर्थव्यवस्थेच्या वार्षकि वाढीच्या तुलनेत चांगला असला तरी मूलभूत निकषाच्या बाबतीत मागे आहे. भारतावर असलेल्या परकीय कर्जाचा बोजा ३९० हजार अब्ज डॉलर असून हे प्रमाण ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) २१ टक्के इतके आहे.

भारतातील काही नामवंत कंपन्यांनी परकीय चलनात उभारलेली अल्पकालीन कर्जे, ज्यांची परतफेड एक वर्षांच्या आत करावयाची आहे, या कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या ४.५ टक्के असले तरी सरकारची डोकेदुखी ठरली आहे. उदारीकरण कार्यक्रमाअंतर्गत कंपन्यांनी बाहेरील देशांतूनही कर्जे उभारणे अपेक्षित असले, तरी भारताच्या बाबतीत ते घडत नाही.. घडलेच तरी न परवडणाऱ्या दरांतली देशी कर्जे कोण घेणार?
रुपयाची घसरण चिंता वाढविणारी बाब असली तरी काही निर्यातप्रधान उद्योगांच्या बाबतीत फलदायी ठरू शकते. आयटी, सॉफ्टवेअर निर्यात, अभियांत्रिकी व वाहन उद्योग, कृषी उत्पादने अथवा कृषी आधारित अन्नप्रक्रिया उद्योग अशा क्षेत्रांना हा फायदा होईल. सर्वसामान्यांच्या जीवनमानात मात्र या उ:शापामुळे फरक पडत नाही. उलट प्रतिकूल परिणामांच्या झळाच सर्वसामान्यांना सोसाव्या लागणार. पेट्रोलियम उत्पादनाच्या किमती गेल्या तीन महिन्यांपासून वाढत असून त्याचा परिणाम वाहतूक खर्च वाढण्यात होतो आहे. ही बाब महागाईचा दर वाढविणारीच आहे आणि राहील. याशिवाय कृषिखते, खाद्यतेल, औषधे, मोटारी, इलेक्ट्रिक / इलेक्टॉनिक वस्तू महाग होत आहेत. यामुळे महागाई नियंत्रित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. पुन्हा महागाई नियंत्रित करण्यासाठी महाग वित्तीय धोरण राबण्याची गरज निर्माण झाली तर कर्जावरील व्याजाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, अगोदरच आलेल्या औद्योगिक क्षेत्रातील मरगळीत भर पडू शकते.
सोन्याच्या बेसुमार आयातीमुळे रुपयाचे पानिपत होण्यास मदत झाली असल्याने सोने आयातीवर र्निबध आणण्याचा भाग म्हणून आयात शुल्क १२ टक्क्यांवर गेले आहे. ते आणखी वाढण्याची शक्यता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सूचित केली आहे.

रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझव्र्ह बँकेने गेल्या सहामाहीत परिस्थिती किमान आणखी ढासळणार नाही, याची काळजी घेतली. परंतु हे प्रयत्न काळजीवाहूच होते. केंद्र सरकारने उशिराने पावले उचलयाला सुरुवात केल्यामुळे मागील तीन महिन्यांत रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरतच गेली. रिझव्र्ह बँक राबवत असलेल्या उपायांपकी बँकांची अतिरिक्त रोखता काढून घेणे, डॉलरची विक्री करणे, डॉलर खरेदी करणाऱ्या तेल कंपन्या, उद्योजक, आयातदार, उद्योगसंस्था, सटोडिये व व्यक्ती यांच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणे व इतर उपाय पुरेसे ठरलेले दिसत नाहीत. खरेतर सोन्याच्या आयातीवर कडक र्निबध आणून त्याच्या खरेदीदारावर उत्पन्न कर विभागाने नजर ठेवण्याची गरज आहे. परकीय चलनाचा ओघ वाढविण्यासाठी अनिवासी भारतीयांच्या ठेवी आकर्षति करण्यासाठी कर सवलतीचा वर्षांव करणेही गरजेचे आहे. भारतीय भांडवल आणि कर्जरोखे बाजारातून मागील एक वर्षांत ११ अब्ज डॉलरची गुंतवणूक देशाबाहेर गेली आहे. गुंतवणूक निर्गमनाचे हे प्रमाण विक्रमीच म्हणावे लागेल. अशा स्थितीत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांना माघारी फिरविण्यासाठी नवीन सवलती जाहीर करणे आवश्यक ठरते.
अर्थव्यवस्थेवरील विश्वासवृद्धीसाठी धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी शीघ्र गतीने करणे, प्रशासकीय सुधारणा राबविणे, भ्रष्टाचार कमी करणे इत्यादी उपाय केले तरच परकीय चलन गंगाजळीत वाढ होईल. नवीन आíथक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर २२ व्या वर्षीसुद्धा परकीय थेट गुंतवणुकीचे भारतातील प्रमाण जीडीपीच्या केवळ १.७५ टक्क्यांपर्यंत गेले, याचा सरळ अर्थ केलेल्या सुधारणा पुरेशा नसून यापुढेही सुधारणा कराव्या लागतील. ११९१च्या दिशेने अर्थव्यवस्थेची वाटचाल होत नसली तरीही घसरत्या रुपयाचे मूल्य अर्थव्यवस्थेच्या आजारपणाचे लक्षण समजून त्याला गांभीर्याने सामोरे गेले पाहिजे.

Sunday, September 1, 2013

कोण जिंकलं??? काय साधलं???

‘जैतापूर अणुउर्जा प्रकल्प होऊ देणार नाही’ अशी हाक देत गेली तीन वर्ष लढा देणार्‍या माडबन संघर्ष सेवा समितीने आपला विरोध मागे घेतलाय. समितीने समझोता करण्याची तयारी दाखवलीय. समितीच्या सदस्यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणेंची भेट घेतली. या बैठकीनंतर प्रकल्पाचा विरोध मागे घेत असल्याचं समितीनं जाहीर केलं.

समितीने अखेरच्या 25 सुचना केल्या असून लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बैठक होणार असून यावर चर्चा केली जाणार आहे अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. तर जनसमुदाय एकत्र होऊ दिला नाही. तो मीच एकत्र केला त्यामुळे यायचं भाषण करायचं याला आंदोलन म्हणत नाही. जैतापूरसाठी आम्ही लाठ्याकाठ्या खाल्यात. आजार पदरात पाडून घेतला पण आता शक्य नाही असं सांगत माडबन जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. दरम्यान, समितीच्या या भूमिकेमुळे जैतापूर प्रकल्पावर विरोध करणार्‍या शिवसेनेला चांगलाच धक्का बसल्याचं बोललं जातंय.

विरोध का मावळला?

जैतापूर प्रकल्पातलं मुळं आंदोलन हे माडबन संघर्ष सेवा समितीने उभारलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मवाळ भूमिका घेतली. आता ही समिती माडबन जनहित सेवा समिती झाली आहे. याला कारण असे की, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदल देण्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर अनेक प्रकल्पग्रस्तांनी मोबदला घेण्यास सुरूवात केली. 2300 खातेदारांपैकी 27 खातेदारींनी सुरूवातीला मुळं मोबदल उचलला त्यांच्यापाठोपाठ 297 जणांनीही मोबदला घेतला. तसंच या आंदोलनाचे नेतृत्त्व करणार्‍या प्रवीण गवाणकर यांना कर्करोगाने ग्रासलं. त्यामुळे त्यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. अखेर आज नारायण राणे यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपला विरोध मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं.

मनी मॅनेजर्स

आपल्याकडे येणारा पैसा सत्कारणी लागतोय की नाही, भविष्यात त्याचा आपल्याला उपयोग होणार की नाही, अगदीच अडचणीच्या वेळी हातात खेळणारा हाच पैसा मदतीला येईल की नाही... अशा सामान्यांच्या मनात उमटणा-या प्रश्नांची उत्तरं 'मनी मॅनेजर्स' देऊ शकतात. हा एक उत्तम करिअरचा पर्यायही होऊ शकतो.

पगार झाल्यानंतर महिन्याचा पेट्रोल, हॉटेल याचे खर्च भागवायचे.... मग घरच्यांसाठी काहीतरी... पुढच्या पगारामध्ये एखाद्या खास व्यक्तीसाठी खरेदी... आणि त्यानंतरचे नेहमीचा खर्च वगळता इतर पगार आपल्यासाठीच..., फार फार तर कुठल्यातरी गुंतवणुकीसाठी वापरायचे की झालं...

बातम्यांमधून बजेटचे वेध लागायला सुरुवात झाली, की नुकतीच कमवायला लागलेली किंवा अगदी चिक्कार पैसा कमावणारी प्रत्येक व्यक्ती असाच विचार करते. त्यासाठी सर्व पर्यायी मार्गही ती चोखाळते; पण शेवटी आपल्याकडे येणारा पैसा सत्कारणी लागतोय की नाही, भविष्यात त्याचा आपल्याला उपयोग होणार की नाही, अगदीच अडचणीच्या वेळी हातात खेळणारा हाच पैसा मदतीला येईल की नाही... अशा असंख्य प्रश्नांविषयी मात्र ती साशंकच असते.

आथिर्क बचतीच्या वा गुंतवणुकीच्या पर्यायांविषयी अशा सर्व शंकांना योग्य पर्यायांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 'पर्सनल फायनान्शियअल अॅडव्हायजर' काम करत असतात.

पैसा मॅनेज करा... दुस-याचा!

एखाद्या व्यक्तिसाठी कमाईच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी निवृत्तीपर्यंतच्या कमाईचे नियोजन करून देण्याचं काम 'पर्सनेल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर'ला करावं लागतं. अल्पमुदतीच्या गुंतवणुकींसोबतच २० वर्षांनंतरच्या कार्यासाठी आवश्यक गुंतवणुकीचं नियोजन करण्याचं वा सुचविण्याचं कामही ते करतात. त्यासाठी ग्राहकाच्या आथिर्क परिस्थितीचा आणि उलाढालींचा अभ्यास करत, योग्य पर्यायांचा सल्ला देणं त्याला क्रमप्राप्त असतं. त्यासाठी त्याला गुंतवणुकीचे सर्व पर्यायी मार्ग, माकेर्टची परिस्थिती आणि अंदाज, छोट्या-मोठ्या आणि नव्याने उदयाला येत असलेल्या कंपन्यांमधील भाग-भांडवल याची परिस्थिती आदी बाबींची माहिती असणं आवश्यक ठरतं.

सीएसपी आणि सीपीएफए

इकडे वळण्यासाठी 'नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सिक्युरिटी माकेर्ट्स'तफेर् घेतली जाणारी 'सटिर्फाईड पर्सनेल फायनान्शिअल अॅडव्हायजर' (सीपीएफए) परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणारे लोक 'पर्सनेल फायनान्शिअल अॅडव्हायजर' म्हणून काम करण्यास पात्र ठरतात. या क्षेत्रामध्ये शिरण्यासाठी कॉमर्सची पार्श्वभूमी असणे कधीही उत्तम; पण तुम्ही निव्वळ बी.कॉम. किंवा एम.कॉम. आहात म्हणून तुम्ही एक यशस्वी फायनान्शिअल अॅडव्हायजर बनू शकता, असेही म्हणता येत नाही. सध्या कॉमर्सच्या शिक्षणाचा कोणताही गंध नसलेले वा अगदी इंजिनीअरिंगची शैक्षणिक पार्श्वभूमी असणारे लोक या क्षेत्रामध्ये काम करताना आपण पाहू शकतो. म्हणूनच कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणारे या क्षेत्राचा करिअरसाठी नक्कीच विचार करू शकतात. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी स्वत: ची स्वत: लाही करता येत असल्याने काम करता-करताही या करिअरचा विचार करता येणे शक्य आहे.

' सटिर्फाईड फायनान्शिअल प्लॅनर' (सीएफपी) परीक्षा जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त परीक्षा असली, तरी तिला आपल्याकडे 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया'ची (सेबी) मान्यता नाही. त्यामुळे आपल्याकडे 'सीपीएफए'चाच विचार केला जातो. उद्योग किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये प्रॉडक्ट सेलिंगचा कामाचा अनुभव घेतल्यानंतर काही लोक या क्षेत्राकडे वळतात. परंतु त्यापेक्षाही माकेर्टिंगचा अनुभव असलेल्यांसाठी हे क्षेत्र तुलनेने सोपे असते. समाजामध्ये वावरताना आवश्यक असणारी सर्वसाधारण कौशल्ये आणि पैशाच्या नियोजनाशी निगडीत सेवांचे माकेर्टिंग करण्याची कौशल्ये जर तुमच्याकडे असतील, तर अनेक नामवंत कंपन्यांमध्ये तुम्ही काम करण्यास पात्र ठरू शकता.

' बेस्ट पसोर्नेल फायनान्शिअल अॅडव्हायजर' ची वैशिष्ट्ये

उत्तम संवाद कौशल्ये

समोरच्या व्यक्तिच्या अपेक्षा जाणून घेण्याची क्षमता

एखाद्या गुंतवणुकीत तोट्यात गेलात तरी त्रागा न करता चूक मान्य करा. पुढच्या वेळी ती टाळण्याची क्षमता हवी.

एखाद्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये शिरल्यानंतर भविष्यात त्याचे परतावे कसे मिळतील, याची माहिती हवी.

चलनवाढीचा अंदाज आणि आथिर्क तरतूदीचं कौशल्य

फायनान्शिअल मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट स्ट्रेटेजिस, इन्शुरन्स प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, टॅक्स अँड इस्टेट प्लॅनिंग या 'पंचसूत्री'ची परीपूर्ण तयारी सो फ्रेंड्स, आकड्यांशी खेळायचा छंद, माकेर्टमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा अभ्यास, आणि शेअर माकेर्टमध्ये आलेल्या उतार-चढावांमुळे अनुभवलेली अस्वस्थता असं काही वाटत असेल आणि समोरच्या व्यक्तिच्या गरजा जाणून घेत त्यांना आथिर्क सल्ला देण्याची साशंकता तुमच्या मनात नसेल, तर 'पर्सनेल फायनान्शिअल अॅडव्हायजर' हा तुमच्यासाठी करिअरचा एक चांगला पर्याय होऊ शकतो. विचार करण्यास नक्कीच हरकत नाही. कारण 'व्हेअर देअर इज ए विल, देअर इज ए पाथ...' अँड सो ऑन!

सरकारचा अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप का आवश्यक असतो???

"" जे सरकार देशाच्या आर्थिक जीवनात कमीत कमी हस्तक्षेप करते ते सरकारचांगले "" ( ""That Government is the best Government which governsLeast"") अशी समजूत अठराव्या शतकात सर्वत्र प्रचलित होती. ह्या विचारानुसारसरकारच्या कार्याचे क्षेत्र अत्यंत मर्यादित होते. त्याकाळी लोकप्रिय असलेला हा विचारआता संपूर्णपणे लुप्त झालेला आहे. Lassez Faire ह्या आर्थिक धोरणाचे माहेरघरसमजल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये सुध्दा अर्थशास्त्रज्ञांचा, राजकीय पुढाऱ्यांचा व जनतेचात्यावर विश्वास राहिलेला नाही. अनिर्बंध भांडवलशाही उत्पादन प्रणालीचा परमोच्चविकास जसा विसाव्या शतकात झाला तसेच ह्या उत्पादनप्रणालीतले सर्व दोषहीविसाव्या शतकाच प्रकर्षने प्रकाशात आलेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही एक अपूर्णव्यवस्था आहे ही गोष्ट आज कुणीही अमान्य करणार नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थे-मधील काही महत्त्वाच्या दोषांबद्दल ह्यापूर्वीच चर्चा केली आहे. हे दोष दूर करूनआर्थिक जीवन सुरळीत करण्याकरिता, देशाचा आर्थिक विकास झपाट्याने करण्या-करिता, सर्व प्रदेशांचा संतुलित विकास गडवून आणण्याकरिता आणि सामान्य जनतेलाआर्थिक व समाजिक न्याय मिळवून देण्याकरिता सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करणेही अत्यावश्यक व अनिर्वाय बाब बनली आहे.


सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता


सध्याच्या परिस्थिती सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्याच्या आवश्यकते-बद्दल पुढे विस्तृत चर्चा केली आहे.



1) आधारभूत सेवा प्रदान करणे- प्रत्येक समाजाला काही आधारभूत सेवा,सोयी व सवलती आवश्यक असतात. व्यक्तीचे किंवा खाजगी संस्थेचे उद्दिष्ट जास्तीत-जास्त नफा मिळविण्याचे असल्यामुळे समाजाला हया आधारभूत सेवा उपलब्ध करूनदेण्याची कामगिरी व्यक्तींकडे किंवा खाजगी संस्थांकजे सोपविता येत नाही. समाजाचीसुरक्षितता, आरोग्य, स्थायित्व, विकास आणि कल्याणाच्या दृष्टिकोनातून आधारभूतसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारणे इष्ट असते. सरकारनेदेशाच्या अर्थकारणात हस्तक्षेप केल्याशिवाय समाजाला आवश्यक असलेल्या मूलभूतसेवा उपलब्ध होऊ शकत नाहीत.


2) महत्त्वाच्या उद्योगांवर सरकारचे नियंत्रण ठेवणे- संपूर्ण समाजाचे हितसुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने काही उद्योगांची मालकी व नियंत्रण सरकारकडेच असणेआवश्यक असते. उदा. संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणारे कारखाने. असे उद्योगव्यक्तींच्या किंवा खाजगी संस्थांच्या ताब्यात असल्यास समाजाची सुरक्षितता व हितधोक्यात येते


3) औद्योगिक विकासाचा वेग वाढविणे- ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सरकारहस्तक्षेप करीत नाही अशा देशाचा औद्योगिक विकास फार मंद गतीने घडून येतो.अर्थकारणात स्थितिशील वातावरण कायम टिकून राहण्याची भीती असते. मंदीच्याकाळात तर अनेक उद्योग बंद पडतात आणि त्यामुळे लक्षावधी कामगारांवर बेकारीचेसंकट कोसळते. ज्या उद्योगांमध्ये महत्तम नफा मिळण्याची शाश्वती असते, अशाउद्योगांची स्थापना करण्यातच भांडवलदार पुढाकार घेतात. प्रत्येक देशाचा औद्योगिकविकास मूलभूत उद्योगांच्या ( Basic Industries) प्रगतीवर अवलंबून असल्यामुळेआणि अशा उद्योगांच्या स्थापनेमध्ये खाजगी भांडवलदार पुढाकार घेत नसल्यामुळे, हीजबाबदारी सरकारनेच स्वीकारायला हवी. सुदृढ पायावर देशाचे औद्योगीकरण करणेआणि औद्योगिक विकासाचा वेग वाढविणे, ही सरकारी हस्तक्षेपाची मुख्य उद्दिष्टेमानली जातात.


4) संतुलित औद्योगीकरण साध्य करणे- खाजगी भांडवलदारांना कोणत्याहीउद्योगात फायदा मिळवण्याची हमी हवी असते. ज्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावरभांडवलाची आवश्यकता असते, जेथे भांडवलाची गुंतवणूक केल्यानंतर उत्पादनाचे कार्यसुरू होण्याकरिता बराच काळ लागतो, जेथे उत्पादित वस्तूंकरिता सुरक्षित व विस्तृतबाजारपेठ नसते व जेथे विविध प्रकारची जोखीम अस्तित्वात असते, अशा उद्योगांमध्येभांडवल गुंतविण्याकरिता खाजगी भांडवलदार सहसा तयार होत नाहीत. देशाचेऔद्योगीकरण व औद्योगिक विकास संतुलित रीतीने घडून यावा ह्याकरिता आणिग्राहकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याकरिता अशा उद्योगांची उपेक्षा करणेमुळीच योग्य नसते. ज्या उद्योगामध्ये भांडवलाची गुतंवणूक करण्याकरिता भांडवलदारतयार नसतात किंवा समर्थ नसतात, असे उद्योग देशात स्थापन करण्यासाठी सरकारनेपुढाकार घेणे आवश्यक असते.



5) सरकारचे उत्पन्न वाढविणे- देशात कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचाप्रयत्न करणाऱ्या सरकारला लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व क्षेत्रांत बराच खर्चकरावा लागतो. वॅगनर यांनी प्रतिपादन केलेल्या  सिद्धांतानुसार ( Wagner's Lawof increasing state activities) सरकारच्या कार्याचा सखोल व विस्तृत अशादोन्ही पद्धतींना वाढण्याची प्रवृत्ती असते. ह्या कारणामुळेच सार्वजनिक खर्चामध्ये( Public Expenditure) सतत वाढ होत जाते. हा खर्च करण्यासाठी सरकारच्याउत्पन्नातही सतत वाढ व्हायला हवी. हा खर्च करण्यासाठी सरकारला लागणारा पैसाप्राप्त करण्यासाठी काही लाभदायक उद्योगांवर सरकार स्वतःचे नियंत्रण ठेवते व असेउद्योग स्वतः चालविते. सरकारच्या उत्पन्नात वाढ करणे हेसुद्धा सरकारी हस्तक्षेपाचेएक उद्दिष्ट असू शकते.


6) अविकसित प्रदेशांचा आर्थिक विकास घडवून आणणे. : प्रत्येक देशात काहीप्रदेश अत्यंत अविकसित असतात. अविकसित प्रदेशांमध्ये उद्योगांच्या स्थापनेकरिता वविकासाकरिता तसेच व्यवसायाच्या संचालनाकरिता आवश्यक असलेल्या सोयींचा वसवलतींचा अभाव असतो. ह्या कारणांमुळेचच खाजगी भांडवलदार तेथे आपल्या भांडवल-लाची गुतंवणूक करून जोखीम स्वीकारण्यासाठी तयार होत नाहीत. अविकासितप्रदेश त्याच अवस्थेमध्ये वर्षानुवर्षे राहण्याचे हेच कारण आहे. अविकसित प्रदेशातएखादा मोठा उद्योग स्थापन झाल्यास नंतर तेथे काही पूरक उद्योगांची स्थापनाहोते, व्यापार वाढीला लागतो, कुशल कामगार आकृष्ट होतात, बाजारपेठा संघटितहोतात आणि अशा रीतीने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला तेथे चालना मिळते. अवि-कसित प्रदेशात मोठे उद्योग किंवा प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकारने अर्थव्यवस्थेतप्रत्यक्षपणे ह्सतक्षेप करणे आवश्यक असते.


7) आर्थिक सत्तेचे केन्द्रीकरण टाळणे : उत्पादनाच्या साधनांवर मूठभरव्यक्तीचा मालकी व नियंत्रण हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे एक ठळक वैशिष्ट्य असते.उद्योगांवरील व्यक्तिगत मालकीमुळे ह्या उद्योगांचा संपूर्ण लाभ समाजातील मूठभरसधन व्यक्तींना मिळतो. त्यामुळे आधीच श्रीमंत असलेल्या व्यक्ती अनेक पटींना श्रीमंतहोतात व आर्थिक सत्तेचे केन्द्रीकरण घडून येते. आर्थिक सत्तेचे केन्द्रीकरण झाल्यासमक्तेदारी प्रवृत्तीची वाढ होते आणि मूठभर व्यक्ती संपूर्ण बाजारपेठेवर आपला ताबामिळवितात. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा तिन्ही दृष्टिकोनांतून आर्थिकसत्तेचे केन्द्रीकरण घडून येणे हानिकारक असते. आधुनिक काळात सरकारने अर्थव्यव-स्थेत हस्तक्षेप केल्याशिवाय आर्थिक सत्तचे केन्द्रीकरण टाळले जाऊ शकत नाही.


8) आर्थिक विषमतेची दरी कमी करणे : व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये अंतर राहणेआवश्यक आहे, योग्य आहे व समर्थनीय पण आहे. परंतु उत्पन्नवितरणातील हीविषमता योग्य मर्यादेपर्यतच असली पाहिजे. कोणत्याही समाजात उत्पन्नवितरणा-